सैयारा' चित्रपटाची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 21.5 कोटी रुपयांचा नफा कमावला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 26 कोटी रुपयांचा कलेक्शन झाला. त्यानंतर काल तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. काल या चित्रपटाने 35.75 कोटी रुपयांची कमाई केली. आता पहिल्या सोमवारच्या टेस्टमध्येही हा चित्रपट टॉपवर आला आहे.
सैयारा' चित्रपटाने पहिल्या सोमवारी 13.79 कोटी रुपये कमावले. यासह, चित्रपटाचे एकूण निव्वळ कलेक्शन 97.04 कोटी रुपये झाले आहे. 'सैयारा'ने आठवड्याच्या दिवशीही दुहेरी अंकात कमाई केली. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. यशराज फिल्म्सने चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. YRF नुसार, भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा एकूण कलेक्शन 101.25 कोटी रुपये आहे. तर जगभरात ही कमाई 119 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.