मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' हा चित्रपट 18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच तो सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रपटाची कथा, गाणी आणि भावनांचे कौतुक केले. 'सैयारा' चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर सुरुवात केली आहे.
सैयारा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अहान पांडेने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. हा चित्रपट आतापर्यंतच्या कोणत्याही नवोदित अभिनेत्याचा सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तसेच, 'सैयारा' हा 2025 मधील चौथा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपटही ठरला आहे.
अहवालानुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 20 कोटी रुपये कमावले आहेत. त्याने अजय देवगणचा 'रेड २' (19.25 कोटी), अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' (12.25 कोटी) आणि आमिर खानचा 'सितारे जमीन पर' (10.70 कोटी) यासारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.