महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारचा काही दिवसांपूर्वी पुणे-बंगरुळु महामार्गावर भीषण अपघात झाला होता. तसेच गौतमीची कार एका रिक्षाला धडकली होती.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात रिक्षा चालकासह अजून दोन जण गंभीर जखमी झाले होते. तसेच सिंहगड पोलिसांनी गौतमीच्या कारच्या ड्रायव्हरला अटक केली आहे.यादरम्यान आता पोलिसांनी कार अपघात बाबत गौतमीला नोटीस पाठवली आहे. अशी माहिती सामोर आली आहे.तसेच पोलिसाधिकारींनी सांगितले गौतमीला चौकशीसाठी उपस्थित राहावे लागेल.
आता माहिती सामोर आली आहे की, रिक्षाचालकाच्या मुलीने मीडियाला सांगितले की, ज्या आरोपीला अटक करण्यात आली आहे तो मुख्य आरोपी नाही आहे. व गौतमी स्वतः त्या गाडीमध्ये उपस्थित होती. दिन वेळेस बोलावल्यानंतर देखील गौतमी चौकशीसाठी हजर राहिली नाही. ती सेलीब्रेटी आहे म्हणून हे प्रकरण दाबण्यात येणार का असे प्रश्न पीडिताच्या मुलीने उपस्थित केले आहे.