प्रसिद्ध अभिनेते रवी तेजा यांच्या वडिलांचे निधन

बुधवार, 16 जुलै 2025 (11:58 IST)
प्रसिद्ध अभिनेते रवी तेजा यांच्या वडिलांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्याचे वडील भूपतिराजू राजगोपाल राजू यांनी हैदराबाद येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. ही दुःखद बातमी येताच साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
ALSO READ: अभिनेता -निर्माता धीरज कुमार यांचे वयाच्या 79 वर्षी निधन
रवी तेजाचे वडील भूपतिराजू राज गोपाल राजू हे व्यवसायाने फार्मासिस्ट होते. त्यांना प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडत असे आणि ते साधे जीवन जगत होते. भूपतिराजू राजगोपाल राजू यांच्या पश्चात पत्नी राज्यलक्ष्मी आणि दोन मुले रवी तेजा आणि रघू राजू आहेत.
ALSO READ: चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान स्टंटमॅनचा दुर्दैवी मृत्यु
भूपतिराजू राजगोपाल राजू हे आंध्र प्रदेशातील जग्गमपेटा येथील रहिवासी होते. आता त्यांच्या निधनाने कुटुंबावरून वडिलांचा आधार हरपला आहे. युजर्स श्रद्धांजली वाहत आहे. 
Edited By - Priya Dixit
 
ALSO READ: दक्षिणेतील ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती