कोर्टातून सलमान खानला दिलासा, तक्रारी नंतर याचिकावरून नाव काढण्याचे आले निर्देश

मंगळवार, 11 जून 2024 (14:41 IST)
सलमान खान बद्दल मोठी बातमी अली आहे. अभिनेत्याला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 
Salman Khan House Firing: अभिनेता सलमान खानला घेऊन बॉम्बे हाईकोर्ट निर्णय दिला आहे. कोर्टाने याचिकेवरून अभिनेत्याचे नाव काढण्याचे निर्देश दिले आहे. सलमान खानच्या घराबाहेर बाहेर दोन हल्लेखोरांनी 14 एप्रिलला फायरिंग केली होती. त्यामध्ये एक आरोपी अनुज थापन चा कारागृहात मृत्यू झाला. आरोपीच्या आईने सीबीआई चौकशी करण्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये  सलमान खानचे देखील नाव सहभागी होते.
 
सलमान खानचे याचिका मध्ये नाव येताच सलमान खान ने देखील एक याचिका दाखल केली. ज्यामध्ये सलमान खानचे नाव काढण्याचे सांगितले होते. आता याच प्रकरणात बॉम्बे हाईकोर्टने काल 10 जून 2024 ला सलमान खानचे नाव CBI चौकशी याचिकेमधून काढण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे सलमान खानचे चाहते खूप खुश झाले आहे. सलमना खान ला मोठा दिलासा मिळाला आहे. 
 
आरोपी अनुज थापनची आई आणि याचिकार्ता रीता देवीला कोर्टाने निर्देश दिले की, त्यांनी याचिकेमधून सलमान खानचे नाव काढावे. न्यायालय म्हणाले की- “सलमान खानचे नाव याचिकेमधून काढून टाकावे. याचिकामध्ये  सलमान खानविरुद्ध कोणताही आरोप किंवा पुरावा मागितला गेला नाही. याकरिता सलमान खानचे नाव याचिकेमध्ये सहभागी ठेवण्यात काही अर्थ नाही. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती