राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

मंगळवार, 11 जून 2024 (14:14 IST)
देशात अनेक ठिकाणी मान्सून दाखल झाला असून, महाराष्ट्र तटीय परिसरात मुळसळधार पाऊस कोसळण्याची इशारा देण्यात आला आहे. 
 
तसेच मुंबई मध्ये आज सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत मुंबईच्या कोलाबा मध्ये 34, बायकुला मध्ये 27, चेंबूर मध्ये 76 आणि सायन मध्ये 35 मिमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
 
तसेच दक्षिण मुंबई आणि रायगड मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होउ शकतो. वर्धा आणि मराठवाडा मध्ये देखील जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई मध्ये 8 जून पासूनच पाऊस कोसळायला लागला आहे. जो 11 जून पर्यंत असाच चालेल. 
 
तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघरला यलो अलर्ट तर ठाणे पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिकमध्ये जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती