अलीकडेच कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला दुबईतून सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाने (KIADB) म्हटले आहे की, मागील भाजप सरकारने फेब्रुवारी 2023 मध्ये राण्याला स्टील प्लांट उभारण्यासाठी जमीन दिली होती. 2023 मध्ये अभिनेत्रीशी संबंधित एका कंपनीला KIADB ने 12 एकर औद्योगिक जमीन दिल्याच्या वृत्ताला बोर्डाने उत्तर दिले आहे.