शादी के डायरेक्टर करण और जोहर' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार होता पण शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. चित्रपटाचे शीर्षक आणि आशय प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर यांच्या गोपनीयतेचे आणि अधिकारांचे उल्लंघन करतो, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.
उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली, कारण त्याचे शीर्षक लोकांना थेट जोहरशी जोडेल. जून 2024 मध्ये करण जोहरने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याने न्यायालयाला सांगितले होते की, जोपर्यंत त्याचे नाव आणि व्यवसाय यासारख्या वैयक्तिक बाबी वापरण्यासाठी त्याची परवानगी घेतली जात नाही तोपर्यंत अशा अधिकारांचे उल्लंघन मानले जाईल.
शादी के डायरेक्टर करण और जोहर' च्या निर्मात्यांनी जूनमध्ये पाठवलेल्या नोटीसवर कोणतीही कारवाई केली नाही, असे करण जोहरने म्हटले होते. माझा या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. चित्रपट निर्मात्यांना माझे नाव वापरून प्रेक्षक त्यांच्याशी जोडले जाऊ शकतील असे नाव द्यायचे होते.