न्यूड फोटोशूट करणाऱ्या रणवीर सिंगच्या घरी पोलिसांची धडक

Webdunia
शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (07:17 IST)
अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. कारण अभिनेत्याला त्याच्या न्यूड मॅगझिन फोटोशूटसाठी मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. गेल्या महिन्यात रणवीर या फोटोशूटमुळे खूप चर्चेत होता. एवढेच नाही तर अभिनेत्याविरोधात अनेक तक्रारीही नोंदवण्यात आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, २२ ऑगस्टला रणवीरला पोलिसांसमोर जाऊन त्याचे म्हणणे नोंदवायचे आहे.
 
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, पोलिस त्याला नोटीस देण्यासाठी रणवीरच्या घरी गेले होते, परंतु त्यावेळी तो घरात उपस्थित नव्हता. काही दिवसांपूर्वी रणवीरने एका आंतरराष्ट्रीय मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ माजला होता. रणवीरच्या चाहत्यांनी त्याच्या बोल्ड स्टेपचे कौतुक केले, तर अनेकांना रणवीरची ही स्टाइल आवडली नाही. अनेक संस्थांनी अभिनेत्याविरोधात तक्रारही केली होती. रणवीरला चित्रपटसृष्टीतून पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. आलिया भट्ट, आमिर खानपासून ते अर्जुन कपूरपर्यंत सर्वांनीच रणवीरला त्याच्या फोटोशूटवर पाठिंबा दिला आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख