Home remedies for dark spots on nose due to specs :आजच्या काळात आपला बहुतेक वेळ संगणक किंवा मोबाईल फोन वापरण्यात जातो. यामुळेच आजकाल वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत चष्मा घातल्यामुळे दृष्टी कमी होत आहे. सतत चष्मा लावल्याने नाकावर काळे डाग पडतात जे खूप वाईट दिसतात. हे डाग दूर करण्यासाठी अनेकजण महागडी क्रीम आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात.पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. काही घरगुती उपायांना अवलंबवून आपण या घरगुती उपाय केल्याने डागांपासून मुक्ती मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
टोमॅटो
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठीही टोमॅटो गुणकारी आहे. ते त्वचेला एक्सफोलिएट करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. टोमॅटोची पेस्ट बनवून नाकावर चिन्हांकित भागावर लावा. असं केल्याने काही दिवसात फरक दिसू लागेल.
कोरफड जेल -
चष्म्यामुळे नाकावर काळे डाग पडत असतील तर एलोवेरा जेलचा वापर करा. कोरफडीमध्ये अँटीएजिंग गुणधर्म असतात आणि ते त्वचेला आर्द्रता प्रदान करते. यासाठी कोरफडीचे पान मधोमध कापून त्याच्या गरची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट डागांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. हवे असल्यास, तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले कोरफडीचे जेल देखील वापरू शकता.
बटाटा-
नाकावरील चष्म्याचे ठसे काढण्यासाठी बटाट्याचाही वापर करू शकता. बटाट्याचा रस त्वचेवर ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतो आणि डाग दूर करण्यास मदत करतो. नाकावरील चष्म्याचे डाग काढण्यासाठी बटाट्याचा रस लावा. यासाठी कच्चा बटाटा घेऊन किसून घ्या. आता ते पिळून त्याचा रस काढा. बटाट्याचा रस प्रभावित भागावर लावा आणि 10-15 मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.