पूनम पांडे रुग्णालयात दाखल, पोलिसांनी पतीला अटक केली, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

Webdunia
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (13:09 IST)
चित्रपट अभिनेत्री पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे पुन्हा एकदा भांडणामुळे चर्चेत आले आहेत. दोघांमधील भांडण इतके वाढले की पूनमला रुग्णालयात दाखल करावे लागले. पोलिसांनी सॅमला अटक केली आहे
 
पूनम पांडेने पती सॅमवर मारहाणीचा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांनी 8 नोव्हेंबर रोजी सॅमला अटक करून न्यायालयात हजर केले. जिथून त्याला ३ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
असे सांगण्यात येत आहे की, पूनमने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सॅमसोबत तिची पहिली पत्नी अलविराबाबत वाद झाला होता. तेव्हा संतापलेल्या सॅमने पूनमला मारहाण केली. यादरम्यान पूनमच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. अभिनेत्री रुग्णालयात दाखल आहे.
 

संबंधित माहिती

पुढील लेख