अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे २७ जूनच्या रात्री निधन झाले. तिच्या मृत्यूबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहे. आता तिच्या मृत्यूबाबत पोलिसांकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, शेफाली जरीवाला तरुण राहण्यासाठी गोळ्यांसह विविध प्रकारची औषधे घेत होती आणि कदाचित रुग्णालयात नेण्यापूर्वी रिकाम्या पोटी या गोळ्या घेतल्याने तिचा रक्तदाब कमी झाला असेल.एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ती शुक्रवारी घरी पूजा असल्याने उपवास करत होती आणि रिकाम्या पोटी अनेक औषधे घेतल्याने तिचा रक्तदाब कमी झाला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि पडली. अधिकाऱ्याने सांगितले की, जरीवालाने शुक्रवारी दुपारी एक इंजेक्शन घेतले होते, जे कदाचित तरुण राहण्यासाठी असावे आणि तिने रात्रीच्या वेळी रोजची औषधे देखील घेतली. त्यांनी सांगितले की, जरीवालाचा रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी झाला आणि ती थरथर कापू लागली, त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिला रुग्णालयात नेले.
पोलिसांनी नमुने गोळा केले
अधिकाऱ्याने सांगितले की, आंबोली पोलिसांनी आतापर्यंत घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या तिच्या पती, पालक आणि घरगुती मदतनीसासह १० जणांचे जबाब नोंदवले आहे. तसेच, त्यांनी स्पष्ट केले की आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, तपासाचा एक भाग म्हणून, फॉरेन्सिक तज्ञांसह पोलिस पथक जरीवालाच्या घरी गेले होते आणि तिच्या औषधे आणि इंजेक्शनसह अनेक वस्तूंचे नमुने गोळा केले होते.जरीवालाच्या मृत्यूसंदर्भात अपघाती मृत्यू अहवाल नोंदवण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.