आता 'सन ऑफ सरदार २' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. यावेळी चित्रपटाची कथा पंजाबपासून दूर असलेल्या स्कॉटलंडमध्ये घडते. टीझरमध्ये विनोदापासून ते अॅक्शनपर्यंतची उत्तम झलक दाखवण्यात आली आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की अजय देवगण एका परदेशी लग्नात अडकतो आणि तिथून सर्व अडचणी सुरू होतात. टीझरमध्ये मृणाल ठाकूर पंजाबी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. याशिवाय दिवंगत अभिनेता मुकुल देवची झलकही दिसते. टीझरमध्ये जवळजवळ संपूर्ण स्टारकास्टची झलक दाखवण्यात आली आहे. अजय देवगणने चित्रपटाचा टीझर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले. २५ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये येत आहे.'
अजय देवगणसोबत, या चित्रपटात मृणाल ठाकूर, नीरू बाजवा, रवी किशन, संजय मिश्रा, विंदू दारा सिंह, चंकी पांडे, दीपक डोब्रियाल, कुब्रा सैत, शरत सक्सेना, मुकुल देव यांच्या भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा यांनी केले आहे.