अभिनेता सलमान खान हा देशातील सर्वात मोठ्या चित्रपट स्टारपैकी एक आहे. तसेच सलमानच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान कार आहे आणि त्यापैकी बहुतेक बुलेटप्रूफ आहे. अलीकडेच, सलमानने त्याच्या कलेक्शनमध्ये एक नवीन बुलेटप्रूफ कार जोडली आहे. त्याच्या कलेक्शनमधील सर्वात नवीन बुलेटप्रूफ कार मर्सिडीज-बेंझ मेबॅक GLS600 आहे. या SUV ची किंमत ३.३९ कोटी रुपये आहे. बुलेटप्रूफ आर्मरिंगसह, या लक्झरी कारची किंमत सहजपणे ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पोहोचते. भारतातील अनेक सेलिब्रिटींकडे मेबॅक जीएलएस६०० आहे, परंतु सलमान कदाचित ती बुलेटप्रूफ असलेली पहिली व्यक्ती आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटो
अलीकडेच, दबंग अभिनेता त्याच्या मेबॅक जीएलएस६०० मध्ये दिसला. कार क्रेझी इंडियाने हे फोटो त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहे. सोशल मीडियावरील एका फोटोमध्ये सलमान खान मर्सिडीज-मेबॅक जीएलएस६०० एसयूव्हीच्या पुढच्या प्रवासी सीटवर बसलेला दिसतो. पोस्टमध्ये म्हटले आहे की ही त्याची नवीन मर्सिडीज-बेंझ जीएलएस६०० एसयूव्ही आहे.