कपिल शर्माच्या शोमधून नवज्योतसिंग सिध्दू बाहेर

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमधून आता नवज्योतसिंग सिध्दू  बाहेर पडले आहेत.  अनेक दिवसांपासून आजारी आहेत. आता कपिल शर्मा शोमध्ये नवज्योत  सिध्दू यांच्या जागी अर्चना पूरणसिंह दिसण्याची शक्यता आहे.


कपिल शर्मा आणि नवज्योत सिध्दू यांच्यात खुर्चीबाबत वाद सुरु असल्याची चर्चा होती. सिद्धू आजारी होते, त्यांना खूप ताप होता. त्यामुळे कपिलच्या रविवारच्या शोचं शूटिंग थांबलं. शिवाय त्यांची खुर्चीही रिकामी झाली होती. परंतु कपिलने सिद्धू परत येण्याची वाट न पाहताच त्यांच्या जागी अर्चना पूरणसिंह यांना बसवलं. ही बाब  यांना सिध्दू आवडली नाही आणि त्यांनी कपिलला कॉल करुन झापलं. कपिलनेही  सिध्दूना संपूर्ण प्रकरण समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीही ऐकण्याची मनस्थितीत नव्हते.

वेबदुनिया वर वाचा