बर्थडे स्पेशल: पैसा कमावण्यासाठी ट्रेनमध्ये हे काम करत होता आयुष्मान खुराना!

Webdunia
शनिवार, 14 सप्टेंबर 2019 (13:36 IST)
आयुष्मान खुरानाचा आज वाढदिवस आहे. सांगायचे म्हणजे चित्रपटात येण्याअगोदर आयुष्मान खुराना रेडियो जॉकी म्हणून काम करत होता. बिग एफएमवर त्याचा शो 'मान न मान, मैं तेरा आयुष्मान' सुपरहिट झाला होता. एमटीव्हीचा पॉपुलर शो रोडीज जिंकल्यानंतर आयुष्मान खुराना चर्चेत आला. यानंतर आयुष्यामानाने वीजे एमटीव्हीसाठी बरेच शो केले. नंतर वर्ष 2012 मध्ये आयुष्यामानाने चित्रपट 'विकी डोनर'पासून डेब्यू केला. चित्रपटासाठी आयुष्यमानाला बरेच अवॉर्ड मिळाले होते.  
 
पैसा कमावण्यासाठी ट्रेनमध्ये हे काम करत होता आयुष्मान...
 
काही दिवस अगोदर कपिल शर्माच्या शोमध्ये आयुष्मान त्याचे चित्रपट ड्रीम गर्लला प्रमोट करण्यासाठी पोहोचले होते. या दरम्यान कपिलने आयुष्यमानाला विचारले होते की ट्रेनमध्ये गाणी गाऊन खरोखर पैसे कमावले काय? तेव्हा आयुष्मान म्हणाला, 'हो हे खरं आहे की कॉलेजच्या दिवसात मी ट्रेनमध्ये गाणे म्हणत होतो. मी आपल्या मित्रांबरोबर चंडीगढ इंटरसिटी ट्रेनच्या सेकेंड क्लासच्या डब्यात प्रवास करत होतो. प्रवासादरम्यान आम्ही डब्यात असे करत होतो. बर्‍याच वेळा लोक आमच्या गाण्याने इतके प्रभावित होत होते की ते आम्हाला पैसे देत होते. आम्ही एक दिवस किमान 1000 रुपये कमावले होते. एवढंच नव्हे तर त्या पैशांनी मी मित्रांसोबत गोवा ट्रीप देखील केली आहे.'
'ड्रीम गर्ल'ची गोष्ट केली तर हे चित्रपट 13 सप्टेंबर रोजी रिलीज झाले होते. तसेच चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शनची रिपोर्ट देखील आली आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शच्या रिपोर्टनुसार चित्रपटाने पहिल्याच दिवशी 10.05 कोटीची कमाई केली आहे. 

संबंधित माहिती

पुढील लेख