मिशन मंगलकडून 200 कोटीचा आकडा पार

अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ सिनेमा अजूनही प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत आणण्यात यशस्वी ठरतो आहे. या सिनेमाने भारतात आतापर्यंत 200.16 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 200 कोटी क्लबमध्ये येणारा हा अक्षय कुमारचा पहिलाच सिनेमा आहे. 
 
सिनेसमीक्षक तरण आदर्शने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. “मिशन मंगलने 200 कोटीचा आकडा पार केला. ही अक्षय कुमारची पहिली डबल सेंचुरी आहे. मिशन मंगलने चौथ्या आठवड्यात शुक्रवारी 73 लाख, शनिवारी 1.40 कोटी, रविवारी 2.10 कोटी, सोमवारी 61 लाख, मंगळवारी 1.01 कोटी, बुधवारी 54 लाख, गुरुवारी 63 लाख रुपये कमावले. मिशन मंगलने तीन दिवसांमध्ये 50 कोटी, पाच दिवसात 100 कोटी, 11 दिवसात 150 कोटी आणि 29 दिवसात 200 कोटी कमवून अक्षय कुमारला त्याचा सर्वात मोठा हीट सिनेमा दिला”, असं ट्वीट तरण आदर्श यांनी केलं. 'मिशन मंगल' या सिनेमात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या मंगळ मोहिमेची खरी कहाणी दाखवण्यात आली आहे. या सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता शरमन जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती