Katrina Kaif गरोदर ? फोटो बघून यूजर्सने करत आहे कमेंट्स

Webdunia
गुरूवार, 11 जानेवारी 2024 (17:19 IST)
Katrina Kaif Pregnancy Rumours बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिचा आगामी चित्रपट 'मेरी ख्रिसमस'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, कतरिना कैफने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे जो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांना ती प्रेग्नंट असल्याचे वाटत आहे. कॅटरिनाने पोल्का डॉट ड्रेसमधील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिचे केस उघडे ठेवले आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

अशा प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या
चाहत्यांनी फोटो पाहताच पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला. काही यूजर्स त्यांचे अभिनंदन करत आहेत, तर काही यूजर्सने फोटोवर हार्ट इमोजी देऊन प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, स्टनिंग, दुसऱ्या यूजरने लिहिले की, चांगली बातमी येणार आहे. दुसऱ्याने लिहिले, सर्वांचे अभिनंदन. तिसर्‍या यूजरने लिहिले की, जेव्हा अनुष्काने पोल्का डॉटमध्ये फोटो शेअर केला तेव्हा काही दिवसांनी ती प्रेग्नंट झाली. सध्या कतरिनाच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स सुरू आहेत. चाहत्यांचा हा केवळ एक अंदाज असला तरी कतरिनाच्या बाजूने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.''

संबंधित माहिती

पुढील लेख