पवारांनी घेतलेल्या बैठकीत आगामी महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारील लागा, अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. यासह महापालिका निवडणुकीसाठी आपल्यासोबत कुणी येवो न येवो याचा विचार करत बसू नका, तयारीला लागा असे स्पष्ट निर्देश शरद पवार यांनी पदाधिकारी आणि वार्ड अध्यक्षांना दिले आहेत.
दरम्यान, दर 20 दिवसांनी शरद पवार मुंबईतील परिस्थितीचा वार्ड अध्यक्षांकडून आढावा घेणार आहेत. तसेच कोणत्या वार्डात पक्षाचं प्राबल्य जास्त आहे, असे वार्ड निश्चित करून त्याचाही आढावा शरद पवार धेणार आहे. त्यामुळे आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराची धुरा स्वतः शरद पवार हाती घेणार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडामुळे शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेची सत्ता टिकवून ठेवण्याचे चॅलेंज यंदा शिवसेनेसमोर असणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना कुणी सोबत येत आहे किंवा नाही, याची वाट पाहत बसू नका, तर प्रत्येक वार्डात तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.