India Tourism : भारत देश त्याच्या विविध भाषा, धर्म आणि पौराणिक परंपरांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. भारतात अनेक धार्मिक स्थळे आहे. मग ते देशातील मंदिरे असोत, मशिदी असोत, गुरुद्वारा असोत किंवा चर्च असोत. प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे महत्त्व असते. म्हणूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक दिसतात. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील पाच मुख्य चर्चबद्दल.....
संत कॅथेड्रल चर्च
हे भारतातील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक आहे.हे चर्च गोव्यात आहे. हे कॅथेड्रल चर्च अलेक्झांड्रियाच्या कॅथरीनला समर्पित आहे. मुस्लिम सैन्यावरील विजयाच्या सन्मानार्थ पोर्तुगीज सैन्याने हे चर्च बांधले होते. या चर्चचे बांधकाम १५६२ मध्ये सुरू झाले आणि ते १६१९ मध्ये पूर्ण झाले. ईस्टर निमित्त तुम्ही नक्कीच येथे भेट देऊ शकतात.
बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च
गोव्यात असलेले हे चर्च जगातील सर्वोत्तम चर्चमध्ये गणले जाते. हे चर्च सुमारे ३०० वर्षांपूर्वी बांधले गेले होते. या चर्चला सेंट फ्रान्सिस जेवियर यांचे घर मानले जाते, कारण सेंट फ्रान्सिस जेवियर यांचे पार्थिव आजही या चर्चमध्ये आहे. ते पाहण्यासाठी जगभरातून लोक येथे येतात.
क्राइस्ट चर्च शिमला शहराच्या मध्यभागी आहे. हे उत्तर भारतातील दुसरे सर्वात जुने चर्च असल्याचे मानले जाते. हे चर्च १८५७ मध्ये निओ-गॉथिक शैलीत बांधले गेले. चर्चमधील पाईप-ऑर्गन भारतीय उपखंडातील सर्वात मोठा आहे, जो सप्टेंबर १८९९ मध्ये स्थापित करण्यात आला होता. येथे कोरीवकामाचे उत्कृष्ट नमुने येथे पाहता येतात.
पारुमाला चर्च
केरळमधील पारुमाला चर्च हे महान संत ग्रिगोरिएस जीर्वाघीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आले. याला पारुमाला चर्च असेही म्हणतात. हे चर्च केरळमधील मानार येथे आहे.
ख्रिश्चन धर्माचे हे तीर्थक्षेत्र केरळमध्ये आहे. असे मानले जाते की सेंट थॉमस यांनी दक्षिण भारतात ख्रिश्चन धर्माची शिकवण पसरवली. हे भारतातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. हे चर्च सेंट थॉमस यांनी बांधले होते. ते एका पर्वताच्या माथ्यावर वसलेले आहे.