दिशा पटानीचे वडील बरेली येथे राहतात, ते निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. काल, म्हणजे शुक्रवारी त्यांच्या घरी गोळीबार झाला. दिशा पटानीचे वडील जगदीश पटानी यांनी या हल्ल्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एनएनआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या गोळ्या झाडल्या गेल्या त्या परदेशात बनवल्या गेल्या होत्या.
एएनआयशी बोलताना जगदीश पटानी म्हणाले, 'माझ्या घरावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. पोलिस शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. पोलिस आणि एडीजी सर्वजण त्यावर काम करत आहेत. गोळ्या स्वदेशी नसून त्या परदेशी आहेत. मला वाटते की 8-10 राउंड फायर झाले. मला सोशल मीडियावरून कळले की गोल्डी ब्रारने याची जबाबदारी घेतली आहे, परंतु परिस्थिती अद्याप स्पष्ट नाही.'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता जगदीश पटणी यांच्या घरावर दोन मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य म्हणाले, "जगदीश पटणी यांच्या घरावर दोन अज्ञात मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती आम्हाला मिळाली. पोलिस पथके तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली. कोतवाली पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपासासाठी एसपी सिटी आणि एसपी क्राइम यांच्या नेतृत्वाखाली पाच पथके तयार करण्यात आल्याची माहिती अनुराग आर्य यांनी दिली. ते म्हणतात, "या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींवर आम्ही कठोर कारवाई करू. मी कुटुंबाला भेटलो आहे आणि त्यांना सुरक्षेचे आश्वासन दिले आहे."