चिपळूणजवळचं तिवरे धरण फुटलं, 2 ठार 22 जण बेपत्ता

Webdunia
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण अतिवृष्टीमुळे फुटलं आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.
 
या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. या दोन जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत.
 
तर 22 जण बेपत्ता आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे.
 
या घटनेनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातल्या सात गावांमध्ये पूर आला आहे.
 
दरम्यान दोन मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
 
पोलीस, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवकांनी बचावकार्य तातडीनं हाती घेतलं आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख