युक्रेनमध्ये पुन्हा नव्याने हल्ले, लव्हिवमधील विद्युत पुरवठा खंडित

बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (19:35 IST)
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये पुन्हा नव्याने हल्ला झाल्याचे वृत्त आहे.
 
तर, लव्हिव शहरातला विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. शेजारील देश असलेला मालडोव्हा देखील यामुळे प्रभावित झाला असून तिथे देखील लोकांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
 
नव्याने झालेल्या हल्ल्यात निवासी इमारतीदेखील आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
याआधी, युक्रेनमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत.
 
काही आठवड्यांपूर्वीच युक्रेनधील ऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले.
 
कीव्हमध्ये नव्याने झालेल्या हल्ल्याआधीच दक्षिण युक्रेनमधील अधिकाऱ्यांनी देखील हे सांगितलं होतं की त्यांच्या भागात पुन्हा नव्याने हल्ले होत आहेत.
 
मायकोलाइव भागाच्या गव्हर्नरांनी सांगितलं की दक्षिण आणि पूर्वेकडून रॉकेटने हल्ले होत आहेत.
 
जवळच असलेल्या झपोरजिया भागात एका प्रसूतीगृहावर क्षेपणास्त्र पडले होते, त्यात एका नवजात बालकाचा मृत्यू झाला होता असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
हा हल्ला रशियानेच केला असा संशय व्यक्त केला जात आहे पण अद्याप कुणीही यावर अधिकृतरीत्या भाष्य केलेले नाही.
 
दरम्यान, लव्हिव या शहराच्या महापौरांनी जनतेला विनंती केली आहे की त्यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
 
नव्याने झालेल्या हल्ल्यांमुळे या शहरातला विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
Published By -Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती