Griha Pravesh Muhurat 2021: नवीन वर्षात आपण केव्हा केव्हा गृह प्रवेश कराल, शुभ मुहूर्त जाणून घ्या

गुरूवार, 28 जानेवारी 2021 (20:23 IST)
आपल्या नवीन घरात प्रवेश करणे कोणालाही अतिशय शुभ मुहूर्त मानले जाते. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की नवीन घरात प्रवेश केल्यावर प्रत्येक गोष्ट शुभ आणि आयुष्यात आनंदाची असावी. म्हणूनच गृह प्रवेश करताना शुभ वेळ आणि इतर काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जेणेकरून घरात आनंद आणि समृद्धी असेल
आणि नवीन घरात प्रवेश आपल्यासाठी शुभ आहे. आम्ही सर्वांनी वर्ष 2021 मध्ये प्रवेश केले आहे, तर जाणून घ्या नवीन वर्षात केव्हा केव्हा गृह प्रवेश होऊ शकतो आणि मुहूर्त जाणून घ्या.
 
गृह प्रवेशासाठी वर्ष 2021चे मुहूर्त
 
जानेवारी - 5, 6, 8, 14, 17, 26 आणि 30
फेब्रुवारी -  12, 14, 16, 20, 23 आणि 28
मार्च- 8, 9, 14, 20, 21, 24 आणि 26
एप्रिल - 1, 11 आणि 20
मे - 6, 8, 10, 12, 16, 18, 20, 21 आणि 30
जून- 2, 3, 10, 12, 15, 16, 21, 22, 25 आणि 27
जुलै - 3, 4, 13, 25, 20, 22, 25, 26 आणि 31
ऑगस्ट - 6, 7, 8, 9, 12, 16, 20, 27 आणि 28
सप्टेंबर - 2, 4, 8, 13, 14, 17, 19, 20, 22, 25, 26 आणि 29
ऑक्टोबर - 1, 9, 10, 12, 14, 15, 18, 21, 23, 25 आणि 26
नोव्हेंबर - 2, 8, 10, 11, 12, 20, 22, 23, 24 आणि 26
डिसेंबर - 4, 5, 10, 13, 15, 18, 19, 22, 25 आणि 31 
 
गृह प्रवेशासाठी शुभ महिने 
गृह प्रवेश करण्यासाठी माघ, फाल्गुन, वैशाख, ज्येष्ठ हे महिने उत्तम मानले जाते, जेव्हा की  आषाढ, श्रावण, भाद्रपद,  आश्विन, पौष इत्यादी महिने गृह प्रवेशासाठी शुभ नाही मानले जातात. 
 
गृह प्रवेशासाठी शुभ तिथी
अमावस्या, पौर्णिमा, पंचक, कृष्ण पक्ष आणि ग्रहण इत्यादीला सोडून शुक्ल पक्षाची   द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी तिथीला गृह प्रवेश करणे शुभ असते. 
 
गृह प्रवेशासाठी शुभ दिन
मंगळवार आणि काही विशेष परिस्थितीत रविवार व शनिवार सोडून  आठवड्याचे सर्व दिवस  शुभ मानले जाते. 
 
गृह प्रवेशासाठी स्थिर लग्न   
गृह प्रवेश नेहमी स्थिर लग्नात केल्याने त्याचे शुभ परिणाम मिळतात. एखाद्या ब्राम्हणाला विचारून हे कार्य करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती