शास्त्रानुसार संक्रांतीच्या ६ तास २४ मिनिट आधीपासून पुण्य काळाची सुरुवात होते. म्हणून यावर्षी ब्रह्म मुहूर्तावर संक्रांतीचे स्नान, दान व पुण्य केले जाईल. या दिवशी दुपारी २ वाजून ३८ मिनिटांचा वेळ संक्रांतीशी संबंधित धार्मिक कार्यांसाठी चांगला असेल. तसे, दिवसभर दान केले जाऊ शकते.