शाहरुख खानची मुलगी सुहाना ने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये पहिल्या दिवशी या प्रकारे केली एंट्री, व्हिडिओ झाला वायरल

शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (12:44 IST)
शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानचे अॅडमिशन जगातील सर्वात मोठी युनिव्हर्सिटीजमधून एक न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत झाला आहे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर 2 महिन्यातच सुहाना खान न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये अॅक्टिंग स्टडीसाठी गेली आहे.   
 
सुहानाचा युनिव्हर्सिटी जातानाचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Repost @gaurikhan ( @get__repost ) . . . . . . . A glimpse of a college freshman day #NYU

A post shared by SRK Gujarat Universe (@srk_gujarat_universe) on

या व्हिडिओत सुहाना न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या पायर्‍या चढत आहे. डेनिम शॉर्ट्स, व्हाईट टी-शर्ट आणि स्नीकर्स घालून सुहाना नवीन कॉलेजच्या सुरुवातीसाठी तयार दिसत आहे.  
 
Photo : Instagram हा व्हिडिओ इंटरनेटवर फार वायरल होत आहे. सुहानाचा हा व्हिडिओ रानी मुखर्जीची आठवण करून देत आहे. ज्या प्रकारे चित्रपट कुछ कुछ होता है मध्ये रानीचे कॉलेजमध्ये एंट्री होते तसेच सुहाना रियल लाईफमध्ये आपल्या कॉलेजमध्ये एंट्री करत आहे.  
सुहानाने जूनमध्ये लंडनच्या आर्डिंगली कॉलेजहून ग्रॅज्युएशन केले होते. शाहरुख आणि गौरी दोघेही डिग्री घेण्यासाठी सोबत गेले होते. शाहरुख खानने सुहानाच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचे काही फोटो देखील शेअर केले होते, जेथे सुहानाला तिच्या ड्रामा सोसायटीमध्ये भाग घेण्यासाठी अवॉर्ड देण्यात आले होते.  
 
सुहाना खान भले बॉलीवूडपासून दूर आहे पण सोशल मीडियाची सेंसेशन बनलेली आहे. सुहानाने वोग मॅगझिनसाठी फोटोशूट देखील करवले आहे. ज्याला फार पसंत करण्यात आले होते. तिची फॅन फॉलोइंगपण एखाद्या अॅक्ट्रेसपेक्षा कमी नाही आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती