पडद्यावर प्रथमच दिसणार आहे ईशान-अनन्याची जोडी, 'खाली पीली'चा फर्स्ट लुक आला समोर

बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (14:55 IST)
ईशान खट्टर आणि अनन्या पांडे प्रथमच मोठ्या पडद्यावर सोबत काम करत आहे. त्यांचे चित्रपट 'खाली पीली'चा फर्स्ट लुक पोस्टर समोर आला आहे. 'सुलतान' आणि 'भारत' सारख्या चित्रपटांचे डायरेक्टर अली अब्बास जफरने याला ट्विटकरून शेअर करत लिहिले आहे की, "आमच्यावर देवाची कृपा सदैव कायम असो''.  
 
सप्टेंबरपासून फ्लोरवर येईल हे चित्रपट  
'खाली पीली'ची शूटिंग 11 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मकबूल खान याला डायरेक्ट करत आहे. जेव्हा की अली अब्बास जफर या चित्रपटापासून प्रॉडक्शनमध्ये पर्दापण करत आहे. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार, जी स्टुडियोज आणि हिमांशू मेहरा देखील प्रॉडक्शनमध्ये सामील होणार आहे. चित्रपट 12 जून 2020मध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलीज होईल.   
 
मीरा नायरच्या सिरींजमध्ये दिसेल ईशान
ईशान डायरेक्टर मीरा नायरची अपकमिंग सिरींजमध्ये देखील दिसणार आहे, जी विक्रम सेठचे नॉवेल 'अ सूटेबल बॉय'वर बेस्ड होईल. यात त्याच्यासोबत तब्बू आणि तान्या मानिकतला देखील दिसणार आहे. वृत्तानुसार या सिरींजला 6 पार्ट्समध्ये बीबीसी वनवर टेलीकास्ट करण्यात येईल.   
 
अनन्याबद्दल बोलायचे झाले तर तिने 'स्टूडेंट ऑफ दि इयर 2'पासून बॉलीवूड डेब्यू केले आहे. सध्या ती मुदस्सर अजीज यांच्या डायरेक्शनमध्ये 'पति पत्नी और वो'ची शूटिंग करत आहे, जी पुढच्या वर्षी 10 जानेवारी रोजी रिलीज होईल. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरची महत्त्वाची भूमिका आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती