रक्ताने माखलेली परिणिती बाथटबमध्ये बसलेली दिसली

पॉला हॉकिन्स यांची प्रसिद्ध कादंबरी 'द गर्ल ऑन द ट्रेन' यावर आधारित याच नावाने प्रसिद्ध नायिका एमिली ब्लंट अभिनित चित्रपटाच्या हिंदी रिमेकची शूटिंग सुरू झाली आहे. यात लीड रोल मध्ये परिणिती चोप्राचा लुक जाहीर करण्यात आला.
 
रिभु दासगुप्ताच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटामुळे परिणिती खूप उत्साहित आहे. मूळ सिनेमात एमिली ब्लंटची भूमिका अधिकश्या नशेत असणार्‍या व्यक्तीची असून एके दिवस एक बेपत्ता व्यक्तीच्या शोधात होत असलेल्या तपासणीचा भाग होते.
 
चित्रपटाच्या पहिल्या लुकमध्ये परिणिती बाथ टबमध्ये रक्ताने माखलेली बसलेली दिसत आहे आणि दुसर्‍या लुकमध्ये तिच्या डोळ्यातील काजळ पसरलेलं आहे. या लुकबद्दल परिणिती चोप्राचे म्हणणे आहे की यात ती मीरा नावाच्या व्यक्तिरेखा साकारत आहे. ती मुलगी दारुडी आहे आणि अशी भूमिका मी आजपर्यंत साकारलेली नाही. 
 
चित्रपटात परिणिती चोप्रासोबत अदिती राव हैदरी, कीर्ती कुल्हारी आणि अविनाश तिवारी दिसतील. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती