'सुपर ३०' ची १०० कोटी क्लबमध्ये दाखल

हृतिक रोशन, मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'सुपर ३०' चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. 'सुपर ३०'ने प्रदर्शनानंतर पहिल्या आठवड्यात  ७५ कोटी ८५ लाख रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात २४ कोटी ७३ लाख रुपयांचा गल्ला जमवला.

आतापर्यंत 'सुपर ३०'ने १०० कोटी ५८ लाख रुपयांचा आकडा पार केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती दिली. चित्रपटाने मुंबईत सर्वाधिक ३१ कोटी ४९ लाख रुपयांची कमाई केली. त्याशिवाय दिल्लीत २० कोटी ६६ लाख तर पंजाबमध्ये ८ कोटी ७७ लाखांचा गल्ला जमवला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती