'वॉर'चे ट्रेलर रिलीज, जबरदस्त अॅक्शन करताना दिसले ऋत्विक रोशन आणि टायगर श्रॉफ

मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (14:31 IST)
यशराज फिल्म्सचे पुढील चित्रपट वॉरचे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये ऋत्विक रोशन आणि टायगर श्रॉफ जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. तसेच वाणी कपूर दमदार रोलमध्ये आहे. दोन ऑक्टोबर गांधी जयंती रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी रिलीज होत असलेले चित्रपट वॉरला हिंदी सिनेमातील आतापर्यंतचे सर्वात मोठे अॅक्शन चित्रपट सांगण्यात येत आहे, याची शूटिंग सात देशांच्या 15 शहरांमध्ये करण्यात आली आहे.  
 
चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनने दिलेल्या सूत्राप्रमाणे अॅक्शन दृश्यांवर यशराज फिल्म्समध्ये मागील 1 वर्षापासून काम चालत आहे. चित्रपटाचे अॅक्शन दृश्य तयार करण्यासाठी आदित्य चोप्राने जगातील चार सर्वात प्रसिद्ध अॅक्शन निर्देशकांना चित्रपट वॉरसाठी सोबत घेतले आहे. द डार्क नाइट, सैन एंड्रियास, जैक रीचर आणि गेम ऑफ थ्रोन्स सारख्या चित्रपटांचे अॅक्शन डायरेक्टर पॉल जेनिंग्स, सेफ हाउस, आई इन द स्काई, डेथ रेसपासून प्रसिद्ध झालेले फ्रांज स्पिलहास, एवेंजर्स एज ऑफ अल्ट्रॉन आणि स्नो पियर्सरमध्ये जबरदस्त दृश्य देणारे सी यंग ओह आणि टायगर जिंदा है, केसरी, मैरी कॉमचे अॅक्शन डायरेक्टर परवेझ शेखने मिळून हे दृश्य तयार केले आहे. चित्रपटाचे निर्देशन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती