साहो नायक प्रभासचं पूर्ण नाव आपल्याला माहीत आहे का?

बाहुबली फेम अभिनेता प्रभास सर्वांचा लाडका असला तरी त्याचं पूर्ण नाव अनेक लोकांना बहुतेकच माहीत असेल. अलीकडेच प्रभास आणि श्रद्धा कपूर कपिल शर्माच्या शो मध्ये पोहचले होते जेथे प्रभासने आपल्या जीवनाशी निगडित अनेक रहस्य उघडले. 
 
शोमध्ये जेव्हा कपिलने प्रभासचं स्वागत केलं तर प्रेक्षक हैराण झाले. त्याने प्रभासला त्याचं पूर्ण नाव घेऊन स्टेजवर आ‍मंत्रित केलं. यापूर्वी कमी लोकांचं त्याचं पूर्ण नाव माहीत होतं. 
 
कपिलने म्हटलं की स्वागत करा वेंकटेश सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपत्ति यांचे. कपिल पुढे म्हणाला की हे नाव 5 लोकांचं नाही तर एकाच व्यक्तीचं आहे कारण तो एकच 5 स्टार्सच्या बरोबरीचा आहे. प्रभासचं पूर्ण नाव ऐकून प्रेक्षकांना आनंद झाला. शोमध्ये कपिलने हे देखील म्हटले की प्रभासचं पूर्ण नाव घेणार्‍याला गिफ्ट देण्यात येईल तेव्हा एकाने योग्य उत्तर दिलं. 
 
फिल्म साहोबद्दल चर्चा करताना प्रभासने सांगितले की या चित्रपटाचं बजेट 350 कोटी रुपये आहे. शोमध्ये प्रभाससह श्रद्धा कपूर आणि नील नितिन मुकेश देखील सामील झाले. सुजित दिग्दर्शित साहो चित्रपट 30 ऑगस्ट रोजी रिलीज होणार असून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती