बिग बींनी सिंधुताईबद्दल 'असा' व्यक्त केला आदर

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लोकप्रिय असलेल्या ‘केबीसी’ कार्यक्रमाच्या सेटवर सिंधुताई सपकाळांचे पाय धरले. परंतु बिग बींनी असं करण्यामागे एक खास कारण आहे. सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या एपिसोडचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. केबीसीच्या सेटवर सिंधुताई सपकाळ यांनी हजेरी लावल्यानंतर बिग बींनी त्यांना पाया पडून नमस्कार केला आणि केबीसीच्या सेटवर त्यांचं स्वागत केलं. सिंधुताई यांचं समाजकार्य फार मोठं आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी असलेल्या आदरामुळे बिग बींनी त्यांना पाया पडून नमस्कार केला.
 
दरम्यान, अनेक अनाथांची माय झालेल्या सिंधुताई ६८ वर्षांच्या असून त्यांनी आतापर्यंत १२०० पेक्षा अधिक लहान मुलांना दत्तक घेतलं आहे. त्याप्रमाणेच त्यांनी अनेक मुलांचा सांभाळही केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती