सोनम कपूरच्या 'द जोया फैक्टर'चे ट्रेलर आज होईल लाँच

गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (14:13 IST)
सोनम कपूर आता तिचे नवीन चित्रपट घेऊन येत आहे. याचे नाव आहे 'द जोया फैक्टर'. आज या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज होणार आहे. चित्रपटाचे ट्रेलर लाँच कार्यक्रमात सोनम कपूरसमेत पूर्ण कास्ट उपस्थित होती. द ज़ोया फैक्टरची कथा याच नावाने 2008 मध्ये आलेल्या अनुजा चौहान यांच्या उपन्यासावर आधारित आहे.   
 
कथा जोयाची आहे, जिला 2011 च्या वर्ल्ड कप मॅचच्या दरम्यान टीमची लकी फॅक्टर समजले जात होते. द जोया फैक्टरला अभिषेक शर्माने डायरेक्ट केले आहे. चित्रपटात दल्कर सलमान ह्याचा देखील लीड रोल आहे.   
 
त्याशिवाय चित्रपटात संजय कपूर देखील दिसणार आहे. 'द जोया फैक्टर'चे निर्माते 27 ऑगस्ट रोजी ट्रेलर रिलीज करण्यासाठी तयार होते, पण नंतर तारीख पुढे वाढवण्यात आली. वृत्त असे आहे की हा प्रोग्रॅम ज्योतिषिंमुळे पुढे ढकलण्यात आला कारण सोनम कपूरला काही चांगल्या ज्योतिषिंकडून ट्विट मिळाले होते, ज्यानंतर तारीख पुढे वाढवण्यात आली.   
आपल्या ड्रेसबद्दल बोलताना सोनमने एका मुलाखतीत म्हटले होते की रेड ड्रेस तिच्यासाठी फार लकी आहे म्हणून सोनम आज आपल्या लकी ड्रेससोबत प्रोग्रॅममध्ये येणार आहे. काही दिवस अगोदर चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले होते. यात जोयाने साडी नेसली होती आणि हातात बॅट हेलमेट घेऊन दिसली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती