वयाच्या 90व्या वर्षी लतादीदींनी उघडले इन्स्टाग्राम अकाउंट

मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (09:17 IST)
अवघ्या जगावर गेल्या अनेक दशकांपासून आपल्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या ‘लता मंगेशकर’ आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात राहणार आहेत. दीदींनी वयाच्या 90 व्या वर्षी इन्स्टाग्रामवर आपले अकाऊंट उघडले असून, त्यांनी आपल्या अकाउंटवर सर्वात प्रथम आपल्या आई वडिलांच्या फोटोचा अल्बम शेअर केला आहे.
तसेच, दीदींनी आपली बहीण मीना मंगेशकर-खडीकर यांच्या सोबत काढलेला एक फोटो देखील शेअर केला.लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या आहे. लतादीदींनी मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, गुजराती अशा अनेक भारतीय प्रादेशिक तसेच विदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती