ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. गावदेवी येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले असून ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. तब्येत खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल केले होते.
 
'शोले' या सुप्रसिद्ध चित्रपटातील 'कालिया'च्या भूमिकेद्वारे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांनी ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. त्यांचा असंख्य लहान भूमिका देखील दर्शकांच्या कायम लक्षात राहिल्या. 
 
कालिया हा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची भूमिका ठरली. चार दशक उलटून गेल्यावरही शोले चित्रपटातील त्यांची कालियाची भूमिका आणि स..स.. सरदार, मैने तो आपका नमक खाया हैं, या संवादाने अजूनही सर्वांच्या मनात घर केलेले आहे.
 
अनेक हिंदी आणि मराठी सिनेमातील त्यांचे संवाद खूप गाजले आणि त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती