हाऊसफुल ४'चा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल

‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ट्रेलर पाहता चित्रपटात सर्व कलाकारांचा पुनर्जन्म झाला असून त्यांना ६०० वर्षांपूर्वीचा काळ आठवत असल्याचे दिसत आहे. तसेच चित्रपटात सगळ्याच कलाकारांचा डबल रोल असणार आहे. ट्रेलरमधील अक्षय कुमारचा लूक पाहता सर्वांना ‘भुल भुलैय्या’ चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. हा ट्रेलर ऑस्ट्रेलिया, दुबई आणि युके येथे एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे. 
 
चित्रपटाचा ट्रेलर पाहता अक्षय कुमार साकारत असलेल्या हॅरी या पात्राला ६०० वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आठवताना दिसत आहेत. चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती