'बिग बॉस' साठी सलमानला मिळते इतकी मोठी रक्कम

शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (11:15 IST)
अभिनेता सलमान खान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस १३च्या सूत्रसंचालनाचे काम करणार आहे. नुकताच सलमानने बिग बॉसच्या गेल्या सीझनसाठी घेतेलेल्या मानधनाचा आकडा समोर आला आहे.
 
सलमानने गेल्या सीझनच्या प्रत्येक भागासाठी ११ कोटी रुपये मानधन घेतले होते आणि आता येत्या सीझनमध्ये तो मानधनात वाढ करणार असल्याचे म्हटले जात आहे. १५ आठवडे चालणारे बिग बॉसचे १३वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षी रंगलेल्या सीझनच्या सूत्रसंचालनासाठी सलमानला एकूण १६५ कोटी मिळाले होते. 
 
सलमानच्या सूत्रसंचालनाने सजलेला हा शो २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या शोची थीम वेगळी असणार आहे. १८ हजार ५०० स्क्वेअर फूटाच्या जागेमध्ये हा सेट उभारण्यात आला असून यंदा या घराला संग्रहालयाचं स्वरुप देण्यात आलं आहे. या घरामध्ये ९३ कॅमेरा बसविण्यात आले आहेत. यंदा या शोमध्ये १४ स्पर्धक सहभागी होणार असून त्यांना १०० दिवस या घरामध्ये रहायचं आहे. यंदा या घरामध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, देबोलिना भट्टाचार्य, रश्मी देसाई, दलजीत कौर, शिविन नारंग, आरती सिंह यासारखे कलाकार सहभागी होणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती