'से रा नरसिंहा रेड्डी' चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

महानायक अमिताभ बच्चन आणि मेगास्टार चिरंजीवी यांच्या आगामी 'से रा नरसिंहा रेड्डी' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बच्चनयांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाल्यानंतर चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. बिग बजेटमध्ये साकारण्यात आलेला हा चित्रपट २ ऑक्टोबरला रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. ब्रिटीश अक्रमनानंतर कशा प्रकारे सर्व भारतीय एकत्र येवून लढा देतात हे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
 
चित्रपटाची कथा योद्धा उय्यालावादा से रा नरसिंहा रेड्डी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन नरसिंहा रेड्डी यांच्या गुरूंच्या भूमिकेत झळकणार आहेत.
 
चित्रपटाचं पहिलं ट्रेलर देखील ५ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे हिंदी,तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये दुसरं ट्रेलर देखील प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती