यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (12:47 IST)
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम सध्या चित्रपट बालामध्ये आयुष्मान खुरानासोबत काम करत आहे. हे चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. यामी आपले होमटाउन हिमाचल प्रदेशात जाण्याची तयारी करत आहे तेथे ती ऑर्गेनिक फार्मिंग किंवा जैविक शेतीच्या नवीन नवीन पद्धतींचे शोध लावणार आहे.  
 
यामीला हे जाणून घ्यायचे आहे की कसे उर्वरक आणि औषधांचे वापर कमीत कमी केला जाऊ शकतो. यामी गौतम ने सांगितले की चित्रपट गिन्नी वेड्स सनीच्या शूटिंगनंतर मी तेथे जाईन. मागच्या वर्षी आम्ही ज्या जमिनीची खरेदी केली होती त्यावर या वर्षी उत्पन्न चांगले झाले आहे. आता हे बघायचे आहे की त्यावर अजून काय सुधारणा करू शकतो. कशा प्रकारे जास्तीत जास्त इको फ्रेंडली तांत्रिकीचा वापर करून आम्ही त्या जागेचा उपयोग करू शकतो.  
 
एक पहाडी असल्यामुळे मला बालपणापासूनच जैविक शेती किंवा ताजे फळ आणि भाज्यांबद्दल नेहमी सांगण्यात आले होते. यामीने त्या वेळेस जैविक शेतीला अर्गीकृत केले होते जेव्हा तिला माहीत पडले की तिच्या राज्यात केमिकल युक्त फळ आणि भाज्यांना कीट लागत आहे. यामी ने या अगोदर एक ग्रीन हाउस देखील स्थापित केले आहे आणि त्याचबरोबर तिने डोंगरावर वसलेल्या तिच्या घरात एक सेंद्रिय बाग देखील लावला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती