मुलांसाठी सर्वोत्तम हे योगासन आणि त्याचे फायदे जाणून घेऊ या

शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (20:45 IST)
मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत मुलांमध्ये लहानपणापासूनच चांगल्या सवयी विकसित केल्या पाहिजे .जेणे करून त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होईल. या साठी चांगला आहार घेणं आणि योगा करणं एक उत्तम पर्याय आहे. या मुळे मुलांची प्रतिकारक शक्ती चांगली होईल आणि त्यामुळे आजारापासून देखील बचाव करण्यात मदत होईल. चला तर मग आज आम्ही असे काही योगासन सांगत आहोत जे केल्यानं मुलांचे आरोग्य चांगले राहतील.
 
1 बालासन -
हे आसन करण्यासाठी सामान्य आसनात बसा नंतर घुडगे मागील बाजूस वाकवून टाचांवर बसा शरीराचा सर्व भर मांड्यांवर टाका.आता हळू-हळू डोकं जमिनीला लावून हात सरळ ठेवा आणि दीर्घ श्वास घेऊन याच अवस्थेत राहा. नंतर सामान्य अवस्थेमध्ये या हीच प्रक्रिया पुन्हा करा. 
 
2 सुखासन -
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर चटईवर बसा. कंबर सरळ ठेवा नंतर दोन्ही हात गुडघ्याजवळ ठेवा. पहिले बोट आणि अंगठा जोडून सरळ उभे राहा. प्राणायाम करीत काही मिनिटे ह्याच अवस्थेत राहावे नंतर सामान्य स्थितीत या. आता हे आसन पुन्हा करा. 
 
3 भुजंगासन - 
हे करण्यासाठी जमिनीवर चटई वर पोटावर झोपा. हातांना जमिनीवर ठेवून हळुवार शरीर उचला.दीर्घ श्वास घेत याच अवस्थेमध्ये राहा नंतर सामान्य स्थितीमध्ये या. अशा प्रकारे हे आसन पुन्हा करा.
 
4 ताडासन - 
हे आसन केल्यानं रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासह उंची देखील वाढते. हे आसन करण्यासाठी ताठ उभे राहा. नंतर हाताला नमस्काराच्या मुद्रेत ठेवा. शरीराचा सर्व भर टाचांवर टाका. नंतर आपल्या क्षमतेनुसार याच अवस्थेमध्ये राहा. नंतर सामान्य अवस्थेमध्ये या. 
 
हे आसन करण्याचे फायदे जाणून घ्या -
 
* हे आसन दररोज केल्यानं मुलांची प्रतिकारक शक्ती बळकट होते.
* शरीरात चपळता आणि ऊर्जा येते.
* शरीरात ताण होतो त्यामुळे उंची वाढल्याने चांगल्या पद्धतीने विकास होतो.
* मेंदू शांत होण्यासह मुलांचा राग आणि चिडचिडेपणा कमी होतो.
* पचन प्रणाली मजबूत होते. 
* वजन वाढणार नाही.    
* स्नायू आणि हाडांमध्ये बळकट पणा येतो. 
* शरीराची वेदना कमी होते.
* मन शांत झाल्यामुळे तणाव कमी होण्यात मदत होते. 
* बद्धकोष्ठता,पोटदुखी  सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
* आळस,कमजोरी आणि थकवा कमी होतो.
* भूक वाढेल .

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती