बीडब्ल्यूएफकडून बॅडमिंटनच्या कॅनडा व यूएस ओपन स्पर्धा रद्द

शनिवार, 13 मार्च 2021 (14:14 IST)
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने शुक्रवारी कॅनडा ओपन व यूएस ओपन सुपर 300 टुर्नामेंट रद्द केल्या आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बीडब्ल्यूएफने हा निर्णय घेतला आहे. यूएस ओपनचे आयोजन या वर्षी 6 ते 11 जुलै या कालावधीत होणार होते तर कॅनडा ओपन 29 जून ते 4 जुलै या कालावधीत होणार होती. 
 
इतकेच नव्हे तर बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धाही स्थगित करण्यात आली आहे. बीडब्ल्यूएफने पत्रकान्वये याबाबत सांगितले की, कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध पाहता आयोजकांना स्पर्धा रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती