स्वीस ओपनमध्ये सिंधू-सायना आमने-सामने येण्याची शक्यता

मंगळवार, 2 मार्च 2021 (15:18 IST)
भारताची विद्यमान विश्व चॅम्पियन पी. व्ही. सिंधू व माजी चॅम्पियन सायना नेहवाल मंगळवारपासून सुरू होणार्या स्वीस ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये आमने-सामने येण्याची शक्यता आहे. तर भारताच्या पुरुष गटातील सीर वर्मा, एच. एस. प्रणॉय व किदाम्बी श्रीकांत या खेळाडूंनीही एकेरी गटातून अनुक्रमे 2018, 2016 व 2015 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते. बी साईप्रणित मागील सत्रात उपविजेता ठरला होता. 
 
हे चार खेळाडू या स्पर्धेत आपल्या मागील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचाही प्रयत्न करतील. या टुर्नामेंटद्वारे ऑलिम्पिक क्वालिफाइंग स्पर्धेचेही पुनरागमन होईल. दुसर्या  मानांकित सिंधूचा पहिल्या फेरीतील सामना तुर्कीच्या नेस्लीहान ईगिटशी होईल. येथे तिचा क्वार्टर फायनलपर्यंतचा प्रवास सोपा आहे. मात्र, अंतिम आठमध्ये तिचा सामना  पाचव्या मानांकित थाई खेळाडू बुसानन ओंगबाम रंगफानशी होऊ शकतो. जिला तिने जानेवारीत टोयोटा थायलंड ओपनमध्ये पराभूत केले होते. दोनवेळची माजी चॅम्पियन सायनाही सिंधूच्या गटातच आहे. उपान्त्य फेरीत या दोन भारतीखेळाडूंचा आमनासामना होऊ शकतो. मात्र, याअगोदर सायनाला कोरियाच्या सहाव्या मानांकित सुंग जी ह्यून आणि डेनर्माकच्या चौथ्या मानांकित मिया ब्लिचफेल्टचे आव्हान पार करावे लागेल. 
 
लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्पदक विजेत्या सायनाचा पहिल्या फेरीतील सामना थालंडच्या पिटायापोर्न चैवानशी होईल. जी विश्व ज्युनियर चॅम्पिनशीपची माजी कांस्पदक विजेती खेळाडू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती