छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ १० मार्चपासून पुन्हा सुरू

शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (08:08 IST)
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल -१ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ १० मार्चपासून पुन्हा सुरू केले जात आहे. या विमानतळाच्या टर्मिनल -1 पासून देशांतर्गत उड्डाण मार्च 2020 पासून तात्पुरते थांबविण्यात आले. 10 मार्चच्या मध्यरात्रीपासून हे टर्मिनल पुन्हा स्थानिक उड्डाणांसाठी कार्यरत होईल.
 
हे टर्मिनल सुरु झाल्यानंतर आता गो एयर, स्टार एअर, एअर एशिया आणि Trujet यांचीही सेवा 10 मार्चपासून होण्याची शक्यता आहे. टर्मिनल -1 मधून या कंपन्यांची सेवा सुरु होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांना विमानाने सहज उपलब्ध होतील. टर्मिनल -२ पासून इंडिगोची बहुतेक उड्डाणे चालविली जातील, तरी बेस फ्लाइट टर्मिनल -१ मधून उड्डाण करतील.
 
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA)  यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच लाऊंज आणि एफ एन्डबी प्रवेश मिळेल. प्रवाशांना सोयीसाठी वाहतुकीचे सर्व प्रकार उपलब्ध करून देण्यात येतील, असे यात नमूद केले आहे.
 
डोमेस्टिक एअरलाइन्स गोएअरने (Go Air) स्वतंत्रपणे सांगितले आहे की, ते 10 मार्चपासून संपूर्ण देशांतर्गत विमानसेवा मुंबईतील टर्मिनल -1 येथे स्थानांतरित करेल. मुंबईतील सर्व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे टर्मिनल 2 (T2) पासून होतील असेही एअरलाइन्सचे म्हणणे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती