चिकन खाल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू

सोमवार, 27 एप्रिल 2020 (11:19 IST)
नागपूरच्या आठरस्ता चौकातील अभिनव अपार्टमेंटमधील प्रथम माळ्यावरील फ्लॅट क्रमांक 202 मध्ये 29 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता विराज ताकसांडे आपल्या पत्नी पूजासोबत राहत होता. शनिवारी रात्री त्याने ऑनलाइन शेजवान चिकन मागवले. ते चिकन खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. तो शौचालयात गेला. तिथून बाहेर येताच खाली कोसळला व बेशुद्ध झाला. पूजाने तातडीने पोलिसांनी कळवले. पोलिस घटनास्थळी पोहचले आणि विराजला ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तापसणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. 
 
या प्रकरणी बजाजानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तापस सुरु केला आहे. बातमी येईपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. तरी हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती