करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन काळ 3 मे पर्यंत वाढवला. या दरम्यान टप्याटप्यानं व्यवहार सुरू करणार असल्याचंही घोषणा केली गेली असून 15 एप्रिल रोजी केंद्रीय गृह मंत्रालयानं यासंदर्भातील नियमावली जारी केली होती. यात ऑनलाइन शॉपिंग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती परंतू आता केंद्रानं यू टर्न घेतला आहे. आता केवळ जीवनाश्यक वस्तु आणि औषधांचीच विक्री करता येईल.