Online etiquette : वर्क फ्रॉम होम करताना या गोष्टीचे पालन करा
शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (15:34 IST)
आजकाल लॉकडाउनमुळे संपूर्ण जगाने घरातूनच काम करणे स्वीकारले आहे. तसेच भारतातील सर्व खाजगी कंपन्याही घरातूनच काम करीत आहे. या साठी दररोज इंटरनेटचा वापर केला जात आहे. यामध्ये ऑनलाईन बैठका देखील घेतल्या जात आहे.
व्हाट्सअॅप, स्काइप, व अन्य व्हिडिओ कॉल देखील वापरले जात आहे. ऑनलाईन साहित्यांचा वापर आपले बॉससह इतर सहकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी उपयोगात येत आहे. अश्या परिस्थितीत ऑनलाइनचा वापर सौजन्याने करणे महत्त्वाचे आहे.
काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या.
1 ऑनलाईन काम करताना किंवा मीटिंग करताना आपण जसे ऑफिसमध्ये स्वतःला सादर करता तसेच स्वतःला सादर करा. आपण जिथे बसता आणि काम करता तिथले वातावरण व्यावसायिक असले पाहिजे.
2 आपल्या अवती भवती स्वच्छता असावी. कुठलाही पसारा नसावा.
3 व्हिडियो कॉल मध्ये नीट नेटके आणि मीटिंग साठी सज्ज दिसायला हवे.
4 मीटिंग करताना मुद्यांची नोंद करण्यासाठी पेन आणि डायरी घेऊन बसा.
5 कॉल मध्ये इतर सहकाऱ्यांशी बोलताना व्यत्यय आणू नये.
6 कॉल चालू असताना कोणतेही अन्य अनुप्रयोग उघडू नये किंवा कुठलाही प्रकाराचे आवाज करू नये.
7 ऑनलाईन बैठकीत असताना आपल्या घरातील सदस्यांचा आवाज किंवा टीव्हीचा आवाज येणार नाही ह्याची खबरदारी घ्या.
8 जिथे बसत आहात ती जागा नीट नेटकी स्वच्छ असावी.
त्याशिवाय इंटरनेट वापरताना ही खबरदारी घ्या -
1 प्रक्षोभक किंवा आक्षेपार्ह टिप्पण्या ऑनलाईन पोस्ट करणे टाळावे.
2 कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती, फोटो किंवा व्हिडिओ सामायिक न करता इतरांच्या गोपनीयतेचा आदर राखावा.
3 कधीही अनावश्यक ईमेल पाठवून इतरांना स्पॅम करू नका.
4 लोकांना वारंवार त्रास देऊन किंवा छळ करून वेब मंचावर किंवा वेबसाइटच्या टिप्पण्यांमध्ये ट्रोल करू नका.
5 कोणत्याही ईमेल किंवा पोस्ट मध्ये मोठी अक्षरे (केपीटल लेटर) वापरणे टाळावे. काही लोकांना असे वाटते की संपूर्ण संदेशासाठी कॅप्सलॉक बटणं ठेवले तर वाचायला सोपे जाईल पण प्रत्यक्षात त्याउलट असत. हे वाचायला तर कठीण आहेच वर एक आक्रोश होतो. जे फार कठीण असतं.
6 ऑनलाईन मंचावर पोस्ट करताना किंवा फोटो किंवा कुठल्याही व्हिडिओ वर टिप्पणी देत असल्यास यूट्यूब किंवा फेसबुक टिप्पण्या सारख्या विषयांवर चिकटून राहा.
7 इंटरनेटवर चुकीची भाषा वापरू नये.
8 अधिक नकारात्मक टिप्पण्यांसह नकारात्मक उत्तर देणे टाळावे. त्या ऐवजी सकारात्मक पोस्टासह नकारात्मक पोस्टाचे चक्राला खण्डीत करा.
9 कोणी काही प्रश्न विचारले असतील आणि त्याचे उत्तर आपणास माहिती असेल तर त्याला मदत करा.
10 ईमेल पाठवताना, विषय क्षेत्र जरूर वापरा जेणे करून ईमेल प्राप्त कर्त्यास ईमेल लवकर ओळखण्यात मदत होईल.