सामनाच्या संपादकपदाची धुरा पुन्हा उध्दव ठाकरे यांच्याकडे

शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (17:42 IST)
शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाचे संपादक पद उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले. गेल्या आठवड्यात ईडी ने संजय राऊतांना अटक केल्यानंतर सामानाची जबाबदारी स्वतःकडे घेतली असून वृत्तपत्राच्या प्रिंट लाईन मध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव संपादक म्हणून छापण्यात आले. तर कार्यकारी संपादक संजय राऊत असतील. 
 
संजय राऊतांना अटक केल्यानंतर वृत्तपत्रातील अग्रलेख आणि रोखठोक सर्कग्य सदरांसंदर्भात चर्चांना सुरुवात झाली होती.संजय राऊत यांनी न्यायालयाकडे अग्रलेख लिहीण्याची परवानगी मागितली होती. मात्र ती नाकरण्यात आली.या सर्व पार्श्वभूमीवर उध्दव यांनी वृत्तपत्राची धुरा हाती घेतल्याचे समजते.
 
मुख्यमंत्री पदभार स्वीकारल्यानन्तर उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तसम्पादक पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांना देण्यात आले होते. आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सामना वृत्तपत्राचे पद स्वीकारले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती