रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दोन टर्म कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विनितकुमार चौधरी यांना उपविभागीय पोलीस अधिकारीपदावर बढती देण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती नवी मुंबई येथील डायल 112 मध्ये करण्यात आली आहे. खेडचे उपविभागिय पोलीस अधिकारी शशिकिरण बाबासो काशिद यांची बदली बृहन्मुंबईच्या सहायक पोलीस आयुक्त पदावर करण्यात आली आहे. गेले दोन वर्ष ते खेड येथे कार्यरत होते. तर चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांची नाशिक शहर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळूरपीट येथील यशवंत केडगे यांची बदली लांजा उपविभागीय पोलीस अधिकारीपदावर करण्यात आली आहे. तर ठाणे ग्रामीण येथील राजेंद्र मुणगेकर यांची बदली खेड उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या मनोज सावंत, नीलेश नाईक यांना कार्यालय अधीक्षकपदावर बढती देण्यात आली आहे. मनोज सावंत यांना रत्नागिरी येथे कार्यालय अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तर नीलेश नाईक यांना सिंधुदुर्ग येथे कार्यालय अधीक्षक पदावर बढती मिळाली आहे. रत्नागिरीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार, प्रकाश पांढरबळे यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. आनंदराव पवार यांची बढतीने पालघर येथे तर प्रकाश पांढरबळे यांची रत्नागिरी येथेच नियुक्ती करण्यात आली आहे.