हा अपघात सकाळी 6 वाजेच्या दरम्यान मुंबई -औरंगाबाद महामार्गावर पळसखेडा चक्का गावाजवळ झाला. बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळतातच स्थानिक नागरिक तातडीने मदतीला आले. या अपघातात बसचालकाचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण गंभीर जखमी झाले आहे.त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही अपघातग्रस्त बस औरंगाबादहून मेहकरच्या दिशेने जात होती. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.