सध्या मुंबईत स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि सुंदर मुंबई अशी ही संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरी पालिकेने स्वछता मोहीम हातात घेतली आहे. या मोहिमेची सुरुवात धारावी मधून शुभारंभ करण्यात आला असून आज या मोहिमेचा दुसरा टप्पा करण्यात आला.
जुहूचौपटी येथे महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हार घालून या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्राच्या किनारी स्वच्छ करणारे यंत्र ट्रॅक्टर चालवून स्वतः स्वच्छतेची पाहणी केली. या वेळी पालकमंत्री दीपक केसकर, आमदार अमित साटम, माजी मंत्री डॉ.दीपक सावंत, महापालिका आयुक्त इकबाल चहल उपस्थित होते.
या स्वच्छता मोहिमेअंतर्गत निवडलेल्या विभागातील रस्ते -पदपथ धूळमुक्त करण्या सोबत बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, फेरीवाला विरहित क्षेत्र, डेब्रिज मुक्त परिसर, केबल्सचे जाळे हटवणे सारखी कारवाई करण्यात येणार आहे.